उस्मानाबाद जुगार विरोधी विशेष मोहिमे दरम्यान 13 छापेउस्मानाबाद - पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने दि. 16.09.2020 रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमे दरम्यान आढळलेले जुगार साहित्य व रोख रक्कम यांची एकत्रीत किंमत 12,375 ₹ आहे. यावरुन खालील नमूद 24 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): महेश हिलीप हाके, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हा गावातील जनता विद्यालया समोरील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 490/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी रामा कांबळे, रा. वरवंटी, ता. उस्मानाबाद हा बावी पाटी येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,005/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या पथकास आढळला.


पोलीस ठाणे, ढोकी: खय्युम सय्यद, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हा ढोकी पेट्रोल पंप चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 500/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी फिरोज पठाण, रा. ढोकी हा ढोकी बसथांबा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 450/-रु. बाळगला असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळला.


पोलीस ठाणे, शिराढोण: शेरखान शेख व संतोष भोरे, दोघे रा. नागुलगाव, ता. कळंब हे दोघे अनुक्रमे गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण मटका जुगार चालवण्याचे एकत्रीत साहित्य व रोख रक्कम 640/-रु. बाळगले असतांना पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळले.


पोलीस ठाणे, नळदुर्ग: धनराज राठोड, रा. वसंतनगर, नळदुर्ग हा वसंतनगर येथील पानटपरीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 510/-रु. बाळगलेला तर पंडीत कबाडे, राजेश पवार, राहुल कबाडे, विनोद राठोड, अनिल पवार, मल्लीनाथ मळगडे, सर्व रा. खुदावाडी हे सर्वजण खुदावाडी येथील कबाडे वस्तीत तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,220/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळले.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): शकील कुरेशी, इमाम सय्यद, बंटी पेठे, अजीम पठाण, चौघे रा. उस्मानाबाद हे सर्व फकीरानगर, उस्मानाबाद येथील अंजुम इसाक यांच्या घरासमोरील जागेत तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 3,610/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले.


पोलीस ठाणे, येरमाळा: समीर शेख, रा. उपळाई, अमर पलंगे, आबासाहेब कसबे, सुनिल बारकुल, तीघे रा. येरमाळा हे सर्वजण येरमाळा बसस्थानक समोरील पाणीविररणच्या जुन्या टाकीखाली तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,900/-रु. बाळगले असतांना पो.ठा. येरमाळा च्या पथकास आढळले.


पोलीस ठाणे, भुम: राजु खामकर, रा. भुम हा पाथ्रुड येथील साई हॉटेलसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 670/-रु. बाळगला असतांना पो.ठा. भुम च्या पथकास आढळला.


पोलीस ठाणे, परंडा: रामेश्वर सोनवणे, रा. तांबेवाडी, ता. भुम हा गावातील देवळाली रस्त्यालगत असलेल्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 420/-रु. बाळगला असतांना पो.ठा. परंडा च्या पथकास आढळला.


पोलीस ठाणे, उमरगा: अविनाश राठोड, रा. उमरगा हा उमरगा येथील डीग्गी रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 960/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

                                                                  

No comments