Header Ads

मुरूम : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

 


मुरुम: ज्योत्सना अर्जुन सुरवसे, वय 40 वर्षे, रा. चिंचोली (भुयार), ता. उमरगा या दि. 22.09.2020 रोजी रात्री घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान रात्री 01.00 ते 02.00 वा. च्या सुमारास पती- अर्जुन धोंडीबा सुरवसे याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी- ज्योत्सना यांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खुन केला. या खुनास ज्योत्सना यांची नणंद- विनंता व तीचा पती- विलास सुर्यवंशी, रा. मुरळी, ता. उमरगा यांनी प्रोत्साहन दिले आहे. अशा मजकुराच्या राम मनोहर कांबळे, रा. निलंगा (मयताचा भाऊ) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण


उस्मानाबाद  जलील खलील सय्यद हे निशांत मते, माऊली चौक, उस्मानाबाद यांच्या दत्तनगर, उस्मानाबाद येथील घरात भाडेतत्वावर राहतात. या घराचे घरभाडे देण्याच्या वादावरुन जलील सय्यद यांना घर मालक- निशांत मते यांनी दि.20.09.2020 रोजी दत्तनगर येथे शिवीगाळ करुन लाकडाने, चाकूने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या जलील सय्यद यांनी दि. 21.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments