उस्मानाबाद : गर्भवती महिलेला वाहनाची धडक, पोटाला गंभीर मार लागल्याने बालक मयत


 उस्मानाबाद - आयाजुद्दीन मजरुद्दीन शेख, रा. मोहा, ता. कळंब हे 9 महिने गर्भवती असलेली आपली पत्नी- अफरीन हिस तपासणी करीता मो.सा. क्र. एम.एच. 12 बीपी 8693 ने दि. 14.09.2020 रोजी 13.50 वा. सु. उस्मानाबाद येथे घेउन येत होते. 

दरम्यान लातुर- येडशी रस्त्यावरील मोहा टी पॉईंट येथे नमूद मो.सा. ने रस्ता ओलांडत असतांना एम.एच. 24 एडब्ल्यु 1132 या वाहनाने त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात आयाजुद्दीन जखमी झाले तर अफरीन यांच्या पोटाला गंभीर मार लागल्याने त्यांचे सिझेरीयन होउन मयत बालक जन्माला आले.

 या अपघातानंतर संबंधीत वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या आयाजुद्दीन शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा दि. 18.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments