उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे


ढोकी: लक्ष्मण शहाजी गडकर, रा. तुगांव, ता. उस्मानाबाद यांच्या गावातील शेत गट क्र. 75 मधील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 16.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील 100 कोंबड्या, 7 शेळ्या, 1 बकरा व शेळ्यांची 3 पिल्ले (एकुण किं.अं.68,000/-रु.) चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या लक्ष्मण गडकर यांनी दि. 17.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद : कल्पना राहुल सोनवणे, रा. पापनाश नगर, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा पावसाने फुगलेला असल्याने तो व्यवस्थीत बंद होत नव्हाता. त्याचा फायदा घेउन तो दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील कपाटात असलेले 25 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व वस्तु, रोख रक्कम 3,000/-रु. तसेच फिर्यादी झोपलेल्या खोलीतील रेडमी व आयटेल असे दोन मोबाईल फोन असा एकुण 1,28,000/-रु. माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या कल्पना सोनवणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: प्रविण भाउसाहेब कवडे, रा. वाशी यांच्या वाशी येथील ‘स्नेहा हॉटेल & बिअरबार’ चे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी 01.30 ते 02.30 वा. चे दरम्यान तोडून आतील 180 मि.ली. विदेशी दारुच्या 58 बाटल्या व गल्ल्यातील रोख रक्कम 2,46,000/-रु. असा एकुण 2,55,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या प्रविण कवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

उमरगा: पार्वती शिवाजी बिराजदार, रा. जवळगाबेट, ता. उमरगा या दि. 16.09.2020 रोजी 07.00 वा. सु. राहत्या घरासमोरील अंगन झाडत होत्या. यावेळी नातेवाई- नरसिंग दगडू बिराजदार यांनी कार क्र. एम.एच. 20 सीएस 2391 ही पाठीमागे घेत असतांना निष्काळजीपणे चालवल्याने पार्वती बिराजदार यांना धक्का बसल्याने त्यांस गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या पार्वती बिराजदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments