Header Ads

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


ढोकी: प्रताप लिंबाजी कांबळे, वय 28 वर्षे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद याने दि. 16.09.2020 रोजी 13.30 वा. सु. ढोकी पो.ठा. च्या प्रांगणात येउन, “माझ्या पत्नीची तक्रार का घेता.” अशी आरडाओरड करुन स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतुन घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुन पो.ठा. ढोकी चे पोहेकॉ- बिभीषन सोनवणे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 309 आणि म.पो.का. कलम- 110/ 117 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 बेंबळी: दत्तु विश्वनाथ सोनटक्के, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद हा दि. 16.09.2020 रोजी गावातील संगम ढाब्याच्या पाठीमागे देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन त्याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments