Header Ads

अल्पवयीन मुलीचे अपहरणउस्मानाबाद जिल्हा: एका 16 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) अज्ञात कारणासाठी तीच्या राहत्या घरुन गावातीलच एका तरुणाने दि. 05.09.2020 रोजी 12.00 वा. सु. तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 06.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

 

                                                                             चोरी

पोलीस ठाणे, तुळजापूर: अमीर ईब्राहीम शेख, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर यांच्या जाधव कॉम्प्लेक्स, तुळजापूर येथील दुकानाचे व शेजारील दुकानाचे वरचे बापूचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 06.09.2020 रोजी मध्यरात्री कापून दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम 47,000/-रु. व सी.सी.टी.व्ही. सह हार्ड डिस्क चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या अमीर शेख यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

  अपघात

पोलीस ठाणे, उमरगा: युवराज निळकंठ चव्हाण- आडे, रा. तळणी तांडा, ता. औसा यांनी दि. 18.08.2020 रोजी 16.30 वा. सु. हनुमानगर झोपडपट्टी, उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मो.सा. क्र. एम.एच. 14 एचझेड 1269 ही निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात युवराज चव्हाण- आडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या निळकंठ सिद्राम चव्हाण- आडे (मयताचे वडील) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

  मारहाण


पोलीस ठाणे, शिराढोण: स्वयंपाक चांगला येत नसल्याच्या कारणावरुन मनिषा नरहरी सावंत, रा. खामसवाडी, ता. कळंब यांना पती- नरहरी भुजंग सावंत यांसह लक्ष्मी सावंत, भुजंग सावंत, रविंद्र सावंत या चौघांनी दि. 01.09.2020 रोजी 16.30 वा. सु. राहत्या घरी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मनिषा यांची 3 वर्षीय मुलगी- सृष्टी हिस मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मनिषा यांनी दि. 06.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उमरगा: स्मशान भुमीत लावलेल्या वाहनांचा व टाकलेल्या कचऱ्याचा जाब मोद्दीन मेहबुब फकीर, रा. हमीदनगर, उमरगा यांनी गल्लीतील झुल्फेकर अजगर अली शेख यांना दि. 03.09.2020 रोजी 21.00 वा. सु. विचारला. यावर चिडून जाउन झुल्फेकर शेख यांनी  मोद्दीन फकीर यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. वडीलांस वाचवण्यास आलेल्या अब्दुल फकीर यासही झुल्फेकर शेख यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मोद्दीन फकीर यांनी दि. 06.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments