Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखलउस्मानाबाद - अजित मुकुंद माळी, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद हे दि. 08.09.2020 रोजी 11.07 वा. सु. उस्मानाबाद शहरातील सह्याद्री हॉस्पीटल समोर होते. यावेळी विजय राठोड व अरुण राठोड, दोघे रा. भानुनगर, उस्मानाबाद यांसह अन्य 3 अनोळखी व्यक्तींनी त्या ठिकाणी येउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन अजित माळी यांना लाथाबुक्क्यांनी, गुप्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या अजित माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 143, 147, 148, 149 अन्वये दि. 08.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.


नळदुर्ग: आपल्या घरासमोरील जागेत पत्रा शेड उभारल्याचा जाब आशा कोंडीबा सुरवसे, रा. मुर्टा, ता. तुळजापूर यांनी दि. 07.09.2020 रोजी 08.30 वा. सु. गावातील भाऊबंद- उमेश सुरवसे यांना विचारला यावर चिडुन जाउन उमेश यांनी महानंदा सुरवसे, सविता सुरवसे व महादेव कदम यांच्या सहकार्याने आशा सुरवसे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आशा सुरवसे यांनी दि. 08.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग: सचिन मधुकर सातपुते, रा. खानापुर, ता. तुळजापूर हे दि. 07.09.2020 रोजी 20.30 वा. सु. गावातीलच महादेव मंदीराजवळ बसले होते. यावेळी शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरुन नातेवाईक- कडप्पा नारायण सातपुते यांनी, “तुला व तुझ्या बापास जिवंत सोडणार नाही.” असे सचिन यास धमकावून सचिनच्या पोटावर चाकुने वार केला. तसेच मुलास वाचवण्यास आलेल्या मधुकर जंगल सातपुते यांच्या छातीवर चाकुने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या मधुकर सातपुते यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504 अन्वये गुन्हा दि. 09.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments