Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात घात, अपघात गुन्हे
अपहरण

आंबी: अनिल प्रशांत समिंदर, रा. वडगाव, ता. भुम हे पत्नी- दिपाली, वय 20 वर्षे असे दोघे दि. 14.09.2020 रोजी 14.30 वा. सु. पांढरेवाडी, ता. परंडा येथील नातेवाईकांकडे होते. यावेळी स्कॉर्पीओ व स्विफ्ट डीझायर अशा दोन वाहनांमध्ये अनोळखी 3 स्त्रीया व 3 पुरुषांनी त्या ठिकाणी येउन आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दिपाली यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन स्कॉर्पीओ वाहनातुन त्यांचे अपहरण केले. अशा मजकुराच्या अनिल समिंदर यांनी दि. 15.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 365, 323, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

 तुळजापूर: अक्षय सुनिल नितळे, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 15.09.2020 रोजी 02.00 वा. सु. तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटलजवळील जगताप हार्डवेअरच्या दुकानासमोर आपला ट्रक उभा करुन ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. दरम्यान त्यांच्याजवळील विवो मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अक्षय नितळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

 भुम: मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 5950 च्या अज्ञात चालकाने दि. 04.09.2020 रोजी 23.30 वा. सु. भुम- पाथ्रुड रस्त्यावरील वरुड येथे मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून पायी चालत जाणाऱ्या विष्णु सुखदेव शिंदे, रा. वरुड, ता. भुम यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघतात विष्णु शिंदे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत मोटारसायकल स्वार घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या देविदास पांडुरंग शिंदे, रा. वरुड यांनी दि. 15.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments