Header Ads

लज्जास्पद : उस्मानाबाद जिल्ह्यात चार महिन्याच्या बालिकेवर ५० वर्षाच्या नराधमाचा लैंगीक अत्याचारउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील  (नाव- गाव गोपनीय) एक 50 वर्षीय पुरुष हा दि. 15.09.2020 रोजी दुपारी 12.00 वा. सु. दारु बाटली देण्यास गावातीलच मित्राच्या घरी गेला होता. यावेळी त्या मित्राची सुन ही अंगनात काम करत होती. अचानक पलंगावर ठेवलेली तीची 4 महिन्यांची मुलगी मोठ्याने रडू लागल्याने तीच्या आईने जवळ जाउन पाहिले असता त्या मुलीच्या जननेंद्रीयातून रक्त आलेले दिसले. त्याबाबत त्या महिलेने बाटली आनुण देणाऱ्या त्या पुरुषास विचारणा केली असता तो काही न सांगता तेथून निघुन गेला. यावरुन त्या पुरुषाने त्या बालीकेवर लैंगीक अत्याचाराचा प्रयत्न करुन तीला जखमी केले आहे. अशा मजकुराच्या बालीकेच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत पुरुषाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, पोक्सो कायदा कलम- 4, 6 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सुनेचा छळ, गुन्हा दाखल 

उस्मानाबाद - आमृता अजय सोळुंके, रा. मुंडे गल्ली, उस्मानाबाद यांनी स्व:च्या आईच्या नावे असलेल्या जमीनीतील हिस्सा विक्री करुन पैसे आनावेत असा तगादा सासरकडील 1)अजय वसंतराव सोळुंके (पती) 2) वसंताव (सासरा) 3) मंगल (सासु) 4) विजय (दिर) 5) सुवर्णा (जाउ), सर्व रा. विद्यानगर, निलंगा, जि. लातुर 6) उत्तम पाटी, रा. भातागळी, ता. लोहारा यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने सन- 2018- 19 या कालावाधीत आमृता यांचा सासरी- विद्यानगर येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या आमृता यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 15.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments