Header Ads

उस्मानाबाद जि.प.च्या विशेष निमंत्रित सदस्यपदी आनंद पाटीलउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या  जलसंधारण आणि जल व्यवस्थापन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी  युवा सेनेचे जिल्हा  सरचिटणीस आनंद सतीशराव पाटील यांची निवड झाली आहे. पाटील हे माजी मंत्री आणि परंड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत गटाचे म्हणून ओळखले  जातात.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप आणि तानाजी सावंत गट युतीची सत्ता आहे. भाजपचे २७ आणि सावंत गटाचे पाच सदस्य आहेत. तीन वर्षानंतर जलसंधारण आणि जल व्यवस्थापन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य निवडीचा मुहूर्त मिळाला आहे. कोव्हीड महामारीमुळे  झूम अँप वरून मिटिंग घेण्यात आली त्यात आनंद सतीशराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाटील यांचे  अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

No comments