डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांची उचलबांगडी

 

 डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांची उचलबांगडी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे  वादग्रस्त उपमुख्य  कार्यकारी अधिकारी  अजिंक्य पवार यांची ठाणे येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासकीय नियम मोडून पुणे वारी केल्याने त्यांना गेल्या एक महिन्यापासुन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने चव्हाट्यावर आणले होते.

उपमुख्य  कार्यकारी अधिकारी  अजिंक्य पवार यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी होत्या.  त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचा पंचायत  विभाग होता,  कर्मचाऱ्याना सापत्नपणाची वागणूक दिल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध उपोषण करून आंदोलन केले होते, त्यात एप्रिल  महिन्यात लॉकडाऊन असताना शासकीय वाहन घेऊन पुणेला अनेकवेळा गेले होते. लॉकडाऊनचे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समज देऊन सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना  दिला होता.

काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उस्मानाबादच्या बँक कॉलनीमध्ये एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते उस्मानाबादेत एकटेच तर त्यांची फॅमिली पुण्यात राहते.

लॉकडाऊन असताना,अजिंक्य पवार हे १७ एप्रिलला ते पुण्याला फॅमिलीला भेटायला गेले होते. २० एप्रिल (सोमवारी) रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले.अजिंक्य पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडले, त्यांनी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा गैरवापर केला, शिवाय प्रशासनाचा पास नसताना पदाचा गैरवापर केला. त्यांच्यावर  कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती.


यासंदर्भात उस्मानाबाद लाइव्हने अनेक वेळा बातम्या प्रकाशित करून प्रकरण उचलून धरले होते. त्यानंतर  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. संजय कोलते यांनी, अजिंक्य पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. आता त्यांची ठाणे येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. 

From around the web