उस्मानाबाद : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाने रणशिंग फुंकले ...

 


 उस्मानाबाद : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाने रणशिंग फुंकले ...


          उस्मानाबाद - औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाने फुंकले रणशिंग असून, उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 


  उस्मानाबाद येथे आज (दि. २९) आगामी काळात होणार्‍या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी  बैठकीत जिल्ह्यातील जास्तीत पदवीधर नागरिकांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करावी तसेच या नोंदणीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र असून त्याने १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी आपली पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच यात ३ वर्षाचा कुठल्याही विषयात डिप्लोमा धारक यासाठी नोंदणी करू शकतो अशी माहितीही त्यांनी दिली.


 उस्मानाबाद : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाने रणशिंग फुंकले ...


            यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी आपली नोंदणी करून घेऊन भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. या बैठकीत ५००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला.


तसेच याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस (संघटन) अॅड. नितिन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, गजानन नलावडे, तसेच युवा मोर्चाचे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


From around the web