उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल


उमरगा: तात्याराव अण्णाराव सुर्यवंशी, रा. कोळसुर (गु.), ता. उमरगा यांचा शेतातील भागीदार- लिंगाप्पा मिसाळे यांच्या गाईने गावकरी- प्रताप विठ्ठल सुर्यवंशी यांच्या शेतातील पिक खाल्ले होते. याचा राग मनात धरुन प्रताप सुर्यवंशी, मैना सुर्यवंशी, देविंद्र सुर्यवंशी या तीघांनी दि. 24.09.2020 रोजी 14.30 वा. सु. जाधवनगर तांडा, कोळसुर रोड येथे तात्याराव सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले.

  याच प्रकरणात त्याच दिवशी तात्याराव सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी, लक्ष्मीबाई सुर्यवंशी या तीघांनी प्रताप सुर्यवंशी यांसह त्यांची पत्नी या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावरुन दोन्ही सुर्यवंशी कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या स्वतंत्र 2  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 28.09.2020 रोजी नोंदवला आहे.


उमरगा: अल्ताफ कुरेशी, जिशान कुरेशी, रज्जाक कुरेशी सर्व रा. काळे प्लॉट, उमरगा यांनी दि. 28.09.2020 रोजी काळे प्लॉट येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गल्लीतीलच- अक्रम बिराजदार व त्यांच्या भाऊ या दोघांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अक्रम बिराजदार यांनी दि. 28.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 येरमाळा: आकाश सुरेश शिंदे, रा. येरमाळा, ता. कळंब हा दि. 28.09.2020 रोजी 22.30 वा. सु. गावकरी- शहारुख रमजान पठाण यांच्या घरासमोर येउन शिवीगाळ करत होता. यावर शहारुख पठाण यांनी शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता आकाश शिंदे याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरावर दगड मारण्यास सुरवात केली. यावर शहारुख पठाण हे घरात जाउन बसले असता पठाण यांच्या घराच्या दरवाजावर व घरासमोरील मोटारसायकलवर दगड मारुन त्यांचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या शहारुख पठाण यांनी आज दि. 29.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments