Header Ads

उस्मानाबाद : न्यू अमर पॅलेस अँड बारवर गुन्हा दाखल


उस्मानाबाद  -मनाई आदेश झुगारुन हॉटेल व बार व्यवसायास चालु ठेवला म्हणून बेंबळी टी जंक्शन येथील स्वत:चे ‘न्यु अमर पॅलेस & बारवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


कोविड- 19 संदर्भाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन अनिल चंदरराम डोके, रा. देशपांडे स्टँड, उस्मानाबाद यांनी दि. 28.09.2020 रोजी 23.50 वा. सु. उस्मानाबाद शहरातील बेंबळी टी जंक्शन येथील स्वत:चे ‘न्यु अमर पॅलेस & बार’ हा व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांना आत बसून मद्य व जेवण देत असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. पथकाने या ठिकानाहुन 3,06,272 ₹ चे मद्यसाठा जप्त केला असुन अनिल डोके यांच्याविरुध्द पोहेकॉ- अन्सार शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 आणि साथ रोग नियंत्रण कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 29.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments