Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलकळंब: बालकांच्या पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून कळंब येथील 1)आरेफ मिर्झा 2) आमीर मिर्झा 3) अमा्रन मिर्झा 4)तय्यब मिर्झा 5)शाहीद शेख 6)सिध्दार्थ बिडबाग 7)आसद सय्यद 8)अल्ताफ शेख 9)हरीओम गोरे 10)वसीम सय्यद 11)उस्मान मिर्झा यांसह अन्य 6 लोकांनी दि. 06.09.2020 रोजी 21.30 वा. सु. कळंब येथील तांदुळवाडी रस्त्यालगत असलेल्या शुभमंगल कार्यालयासमोर  भिमनगर, कळंब येथील सम्राट मच्छिंद्र गायकवाड व किसन मचाले या दोघांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दगड, बिअरची बाटली, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात सम्राट गायकवाड यांच्या चेहऱ्यास, डोक्यास गंभीर जखम झाली तर किसन मचाले यांच्या नाकाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या सम्राट गायकवाड यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 147, 148, 149, 326, 336, 337, 338, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 शिराढोण: दि. 05.09.2020 रोजी 17.30 वा. सु. कळंब तालुक्यातील निपाणी गावातील सचिन शाहु गुंड यांनी आपली मोटारसायाकल स्वत:च्या घरासमोरील रस्त्यावर लावली होती. या मोटारसायकलमुळे रहदारीस अडथळा होत असल्याने त्यांचा भाऊ- सुनिल शाहु गुंड याने सचिन गुंड यांना मोटारसायकल लावल्या ठिकाणाहुन काढण्यास सांगीतली. यावरील वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही भावांच्या कुटूंबातील स्त्री- पुरुष सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, लोखंडी गजाने मारहाण केल्याने दोन्ही गटाती सदस्य जखमी झाले.अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 08.09.2020 रोजी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments