Header Ads

उस्मानाबाद : नियमबाह्य आंदोलन करणाऱ्यांवर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल
उस्मानाबाद :  कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने  जिल्हाधिकारी तथा  अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई ओदश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन 1)सुशिल उपळकर 2) विराट भातलवंडे 3) प्रशांत चव्हाण, तीघे रा. दहिफळ 4) मारुती गुंड 5) ज्ञानेश्वर माने, दोघे रा. पाडोळी 6) सचिन शिंदे, रा. तुळजापूर 7) सचिन भराटे, रा. पारा 8) कृष्णा बिक्कड, फक्राबाद, ता. केज 9) रंजीत आडे, रा. आंदोरा 10) किरण मस्के, रा. गोविंदपुर 11) अजय साकडे, रा. नायगाव यांनी दि. 07.09.2020 रोजी 13.30 वा. सु. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवाना, नियमबाह्य आंदोलन केले. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोउपनि- श्री सदानंद भुजबळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 11 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 271 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  दि. 07.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरात अतिक्रमण हटाव मोहिम चालू असतांना 1) रईस बागवान 2) जावेद बागवान, दोघे रा. समर्थ नगर, उस्मानाबाद 3) हरीभाऊ पेटे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी शहरातील प्रेस्टीज हॉटेल समोरील फुटपाथवर अतिक्रमणत असलेल्या आपापल्या दुकानांसमोरील डांबरी रस्त्यावर मुरुम टाकुन सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले. यावरुन लोकसेवक- विलास गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम उस्मानाबाद खबरेवरुन मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम- 3 अन्वये दि. 07.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments