Header Ads

भूम : मौजे चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये नऊ लाखाचा अपहार


भूम : लोकसेवक- 1) प्रदीप मधुकरराव जाधव, रा. महालिंगरायवाडी, ता. उमरगा 2) अनिल सदाशिव चव्हाण, रा. डोंजा, ता. परंडा (सध्या दोघे पंचायत समिती, परंडा येथे कार्यरत) 3) महादेव गणपती वारे, रा. चिंचोली यांनी दि. 11.01.2019 ते 24.06.2020 या कालावधीत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून, मुल्यवर्धीत दस्तऐवजाचा गैरवापर करुन मौजे चिंचोली, ता. भुम ग्रामपंचायत कार्यालयात एकुण 9,28,934/-रु. अपहार करुन शासनाची फसवणुक केली. तसेच घोटाळ्या संबंधीचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते अभिलेख गायब केले. यावरुन ग्रामसेवक- दत्तात्रय गरड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409, 467, 468, 471, 201, 34 अन्वये गुन्हा दि. 02.09.2020 रोजी नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 


तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील मौजे सांगवी (मार्डी) येथे दि. 01.09.2020 रोजी गावातील डोलारे कुटूंबीयांतील कृष्णा, प्रशांत, शेषेराव, उषा डोलारे यांच्या गटाचा कांबळे कुटूंबीयांतील- आकाश, रामलिंग, शिवलिंग, हिमांशु, निलेश कांबळे यांच्या गटाशी मागील भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, विटा, लोखंडी गज, कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 02.09.2020 रोजी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


 बेंबळी: शालिवान सिद्राम माने, रा. कोटनिस नगर, सोलापुर हे शासकीय ठेकेदार आहेत. ते दि. 03.09.2020 रोजी 10.00 वा. सु. इनोव्हा कार क्र. एम.एच. 14 एचडब्ल्यु 9011 ने लासोना चौकातुन जात होते. यावेळी टाटा सफारी क्र. एम.एच. 25 आर 9104 या वाहनाने त्यांचा रस्ता आडवला. टाटा सफारीमधुन आलेल्या 1) महेश साळुंके 2) राजन देशमुख 3) रोहितराज दंडनाईक 4) राहुल पवार 5) ओम पवार, सर्व रा. उस्मानाबाद यांनी शालिवान माने यांना, “तु नितळी कारखान्याकडे कशाला गेला होता. या भागात फिरलास तर तुला संपवू.” असे धमकावून इनोव्हा कार मधुन बाहेर ओढून काढले आणि लाथाबुक्क्या, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच  इनोव्हा कारची पुढील- मागील काचा दगड- काठीने फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या शालिवान माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 341, 324, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                     

No comments