मराठा आरक्षण : आमदार - खासदारांच्या घरासमोर २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन

 

 

मराठा आरक्षण : आमदार - खासदारांच्या घरासमोर  २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन


उस्मानाबाद : सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मराठा समाजने आता राज्यस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरासमोर दि. २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करून आंदोलनाची सुरवात होणार असल्याची माहितीची मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यात २ दिवसापूर्वी मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली होतीतर काल नाशिक येथे छत्रपती संभाजीराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षेखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्येही मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातही होणारे आंदोलनराज्यस्तरीय बैठकितील धोरणाप्रमाणे होणार आहेत. त्या नुसार आता २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, या बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्च्याने अधिकृत रित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी व शासनाला देण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात तालुकास्तरीय समन्वयक यांची निवड करण्यात येणार आहे.


तसेच हे आंदोलन होत असताना "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या प्रमाणे सेशल नियमावलीचे पालन करून तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टंसीग चे पालन करून सर्व आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे.

From around the web