Header Ads

कळंब : दोन गटात हाणामारी, दोघांचा मृत्यूकळंब  - दोन गटांत झालेल्या हाणामारीत तालुक्यातील देवधानोरा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी  दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या हाणामारीत मृत्युमुखी पडलेल्या मृताचा मुलगा, पत्नी व अन्य एक असे तिघा जणांना गंभीर मार लागल्याने उस्मानाबादच्या शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसानी दिलेल्या माहितीवरून मागील भांडणाची कुरापत काढुन मंगरूळ शिवारातील पारधी वस्तीवरील मोठा जमाव देवधानोरा शिवारात दाखल झाला. शेती व जुन्या भांडणाची कुरापत काढत या जमावाने देवधानोरा येथील पारधी समाजातील लोकांना मारहाण करण्यास सुरवात केली. हातात काठ्या, कुऱ्हाडी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात संतोष शिवाजी पवार (वय १८) व शिवाजी बिचवा पवार (वय ४५) यांचा जागीच मृत्य झाला.

त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व अन्य एक असे तिघा जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, येरमाळा, शिरढोण  येथील सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मृत दोघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नेमके काय घडले ? 

शिवाजी बिछवा पवार, रा. पारधी वस्ती, देवधानोरा, ता. कळंब हे दि. 06.09.2020 रोजी 14.00 वा. सु. आपल्या कुटूंबासह राहत्या घरी होते. यावेळी त्यांचे नातलग असलेले 1) बालाजी शिंदे 2) दशरथ शिंदे 3) सागर शिंदे, हे तीघे भाऊ रा. मांडवा 4) बालाजी पवार 5) दत्ता पवार, दोघे रा. नागुलगांव 6) राहुल पवार, रा. देवधानोरा व अन्य 5 लोक घरासमोर आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी शिवाजी पवार यांच्यासह कुटूंबीयांस शिवीगाळ करुन कुऱ्हाड, लोखंडी गज, विळा, कोयता, काठी, दगडाने मारहाण सुरु केली. या मारहाणीत शिवाजी पवार यांचा जागीच मृत्यु होउन त्यांचा मुलगा- संतोष याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर दुसरा मुलगा- दिनकर यासह पुतण्या- तुकाराम हे गंभीर जखमी झाले. हा मारहाण प्रकार पाहुन शिवाजी पवार यांचा तीसरा मुलगा- अरुण हा घरातील पलंगात लपल्याने बचावला. अशा मजकुराच्या अरुण शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 307 इत्यादी नुसार  गुन्हा नोंदवला आहे.

No comments