भूम : मोटारसायकलने धडक दिल्याने एकाचा मृत्यू


भुम: सचिन राजेंद्र जाधव, रा. कैकाडी गल्ली, भुम याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 5128 ही साठे चौक, भुम येथे दि. 27.09.2020 रोजी 09.00 वा. सु. निष्काळजीपणे चालवून पायी चालत जाणाऱ्या सुदाम मारुती गायकवाड, रा. सरमकुंडी, ता. वाशी यांना धडक दिली. या अपघातात सुदाम गायकवाड हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- रमेश सुदाम गायकवाड यांनी अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सी.आर.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

परंडा: कृष्णाबाई रोहिदास गणगे, वय 75 वर्षे, रा. आसु, ता. परंडा या दि. 28.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरी होत्या. यावेळी कैलास भिकाजी सातपुते, रा. टेभुर्णी, जि. सोलापूर यांनी कृष्णाबाई राहत असलेल्या घराच्या मालकीच्या कारणावरुन त्यांच्या घरात घुसून कृष्णाबाई यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच घर रिकामे न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कृष्णाबाई गणगे यांनी दि. 29.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments