Header Ads

अणदूर मध्ये तरुणाची आत्महत्यापोलीस ठाणे, नळदुर्ग: हरी लक्ष्मण साळुंके, वय 27 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 23-24.09.2020 या कालावधीत गाव शिवारातील गोलाई पणन येथील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीचा यापुर्वीच पहिला विवाह झाला होता. ही हकीकत सासु- सासरे व अन्य चौघे व्यक्ती यांनी हरी साळुंके यांच्यापासुन लपवून ठेवली होती. याच फसवणुकीमुळे हरी याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली आहे. यामुळे त्याच्या आत्महत्येस सासरकडील 6 लोक जबाबदार आहेत. अशा मजकुराच्या अंबिका वाघमोडे (मयताची बहिण) यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत.

स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. भुम गु.र.क्र. 81 / 2015 भा.दं.सं. कलम- 307, 325 या गुन्ह्यातील आरोपी- बालाजी शिवराम शिंदे, वय 30 वर्षे, रा. पारधी पिढी, मोहा, ता. कळंब हा पोलीसांना तपासकामी हवा होता. स्था.गु.शा. चे पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील सपोनि- श्री आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने त्यास दि. 26.09.2020 रोजी कळंब शहर परिसरातून ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 

No comments