Header Ads

उपचारादरम्यान पलायन करणाऱ्या कोविड- 19 च्या 2 रुग्णावर 2 गुन्हे दाखल उमरगा: शारद सतिश कांबळे, रा. माडज, ता. उमरगा या कोविड- 19 ग्रस्त असल्याने त्यांच्यावर उप जिल्हारुग्णालय, उमरगा येथे उपचार चालू असतांना दि. 05.09.2020 रोजी 11.30 वा. सु. त्या परस्पर निघुन गेल्या. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन वैद्यकीय अधिकारी- डॉ. विनोद जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

कळंब: अशोक श्रीराम मोरे, रा. कसबा गल्ली, कळंब हे कोविड- 19 ग्रस्त असल्याने त्यांच्यावर उप जिल्हारुग्णालय, कळंब येथे उपचार चालू असतांना दि. 21.08.2020 रोजी दुपारी ते तेथून परस्पर निघुन गेले. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन वैद्यकीय अधिकारी- डॉ. स्वप्निल शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments