Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील मोहिमे दरम्यान 11 छापेउस्मानाबाद जिल्हा: काल शुक्रवार दि.07.08.2020 रोजी अवैध मद्य विरोधी मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी मद्यार्क निर्मीतीचा 5,250 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 196 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 331 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून नष्ट केलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 2,37,652 ₹ आहे. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यांत म.दा.का. अंतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पो.ठा. नळदुर्ग: महादेव श्रीपती कांबळे, रा. खानापुर, ता. तुळजापूर हे मौजे खानापुर शिवारातील शेतात 23 लि. गावठी दारु (किं.अं. 1,440/-रु.) बाळगले असतांना आढळले.

सलीम इस्माईल शेख, रा. बोरगांव (तु.), ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा जवळ 9 लि. गावठी दारु (किं.अं. 640/-रु.) बाळगला असतांना आढळला.

सुलोचना महादेव भरगंडे, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर या मौजे सलकरा (दि.) येथे 10 लि. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

दयानंद पंडीत भोसले, रा. वत्सलानगर, अणदुर, ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. शिराढोण: 1)रमेश मच्छिंद्र काळे 2)सिंधुबाई नाना काळे 3)लता अरुण काळे, तीघे रा. पारधी पिढी, शिराढोण, ता. कळंब हे तीघे आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत गावठी दारु निर्मीतीचा 1,050 लि. द्रवपदार्थ व 30 लि गावठी दारु. (साहित्यासह एकुण किं.अं. 44,360/-रु.) बाळगले असतांना आढळले.

पो.ठा. ढोकी: 1)विजयकुमार चंद्रकांत झाडके 2)शिवराज धर्मराज देशमुख, दोघे रा. खंडाळा, ता. लातुर हे दोघे मौजे कोल्हेगाव फाटा येथे कार क्र. एम.एच. 12 सीडी 7319 मधून देशी दारुच्या 317 बाटल्या (किं.अं. 16,484/-रु.) विनापरवाना वाहतुक करत असतांना आढळले.

पो.ठा. उमरगा: 1)अबु पोमा राठोड 2)किरण रतन चव्हाण 3)मोहन रामा चव्हाण 4)गोपीनाथ रुपला राठोड, चौघे रा. पळसगांव तांडा, ता. उमरगा हे सर्वजन मौजे पळसगांव तांडा येथे गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ 21 बॅरल व 100 लि गावठी दारु. (साहित्यासह एकुण किं.अं. 1,71,950/-रु.) बाळगले असतांना आढळले.

पो.ठा. बेंबळी: सुनिल दशरथ कदम, रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हा मौजे आंबेवाडी चौकात देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. तामलवाडी: राजेंद्र रुद्राप्पा कदम, रा. पिंपळा (खुर्द), ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 900/-रु.) बाळगला असतांना आढळला.

No comments