Header Ads

चोरीच्या 2 मोबाईल फोनसह 2 आरोपी ताब्यातउस्मानाबाद -  चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध सायबर पो.ठा. मार्फत निरंतर घेतला जातो. अशाच प्रकरणी पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 198 / 2020 या गुन्ह्यातील चोरीस गेलेला 5,000/-रु. किंमतीचा व्हीवो मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 13.08.2020 रोजी शरद पंढरी घुटे, वय 21 वर्षे, रा. आरणी, ता. उस्मानाबाद यास नमूद मोबाईल फोनसह ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव पो.ठा. ढोकीच्या ताब्यात दिले आहे.

नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकास समजले की, सोलापूर जिल्ह्यातील वैराग पो.ठा. गु.र.क्र. 323 / 2020 मधील चोरीचा सॅमसंग मोबाईल फोन हा आरणी परिसरात आहे. यावर पथकाने छापा टाकून चोरीस गेलेल्या नमूद सॅमसंग मोबाईल फोनसह सुरज संजय मुळे, वय 21 वर्षे, रा. आरणी यास ताब्यात घेउन पो.ठा. वैराग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पोनि-  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.ठा. चे सपोनि-  सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि-  आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments