Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
बेंबळी: दत्तात्रय पांडुरंग भोगील, रा. दांडेगांव, ता. भुम हे दि. 13.08.2020 रोजी 10.00 ते 17.00 वा. सु. शेतात होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या राहत्या घराचे कुलून अज्ञात चोरट्याने तोडून आतील धान्याच्या काठीमध्ये ठेवलेले 25,000/-रु. व 3.5 ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या दत्तात्रय भोगीले यांनी दि. 13.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उमरगा: अंकुश रामराव सुर्यवंशी, रा. बाबळसुर, ता. उमरगा यांचा प्रिमीयर पीआर 708 हा फवारणी पंप दि. 04.08.2020 रोजी 22.00 वा. सु. बाबळसुर येथील शेतातील गोठ्यासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या अंकुश सुर्यवंशी यांनी दि. 13.08.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments