Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाया
पोलीस ठाणे, कळंब: विजयकुमार आश्रुबा राखुडे, रा. खडकी, ता. कळंब हा दि. 24.08.2020 रोजी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,150/-रु. बाळगलेला पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, वाशी: समाधान पंडीतराव ‍क्षिरसागर, रा. वाशी हा दि. 24.08.2020 रोजी पारा येथील चिरकाड वस्तीवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 600/-रु. बाळगलेला पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, परंडा: जिलानी दिलदार मनियार, रा. समतानगर, परंडा हा दि. 24.08.2020 रोजी परंडा येथील चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 470/-रु. बाळगलेला पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, आनंदनगर: मच्छिंद्र विश्वनाथ रणखांब, रा. शिवनेरीनगर, उस्मानाबाद हा दि. 24.08.2020 रोजी उस्मानाबाद येथील नगरपालीका गाळ्यात मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 540/-रु. बाळगलेला पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, मुरुम: 1)रामलिंग बसलिंग अंबुसे 2)राजेंद्र मारुती कांबळे, रा. मुरुम हे दोघे दि. 24.08.2020 रोजी अशोक चौक, मुरुम येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 7,430/-रु. बाळगलेले तर त्याच दिवशी मुरुम येथील 1)कृष्णा संजय हानचाटे 2)राम बाबुराव कदम 3)सुदर्शन हणमंत औताडे हे तीघे महादेवनगर, मुरुम येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह रोख रक्कम 11,480/-रु. बाळगलेले पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले.

       यावरुन वर नमूद 9 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 6 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
No comments