Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमीनळदुर्ग: चालक- ईस्माईल सलिम जमादार, रा. नवीन वीडी घरकुल, कुंभारी, ता. अक्कलकोट याने ट्रक क्र. एम.एच. 13 सीयु 5547 हा दि. 13.08.2020 रोजी 19.00 वा. सु. बाभळगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील पुलावरुन निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने तो पुलाखालील पाण्यात पडला. या अपघातात ट्रकमध्ये असलेले 1) सरुराज युनुस शेख, वय 24 वर्षे, रा. नवीन वीडी घरकुल कुंभारी 2) महादेव भिक्षापती रासकोंडा, रा. हैद्राबाद हे दोघे मयत झाले. अशा मजकुराच्या एजाज युनुस शेख, रा. नवीन विडी घरकुल कंभारी यांनी दि. 14.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: राजु गोरोबा सरपे, रा. उमरगा याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 7891 ही दि. 12.08.2020 रोजी 11.30 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.- 65 वर निष्काळजीपणे, हयगईने चालवून पायी चालत जाणाऱ्या जयप्रकाश नारायण शिंदे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात जयप्रकाश शिंदे यांचा डावा पाय मोडला आहे. अशा मजकुराच्या जयप्रकाश शिंदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 14.08.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

Unknown said...

दररोज चेनलवर येनारा करोना रिपोर्ट चार्ट झुम होत नाही यावर काही उपाय करावेत