Header Ads

डाळींब : ट्रकने धडक दिल्याने महिलेचा मृत्यूमुरुम: फातीमा ईस्माईल सय्यद, वय 28 वर्षे, रा. डाळींब, ता. उमरगा या दि. 11.08.2020 रोजी 14.15 वा. सु. गावातील हरी ओम ट्रेडर्स समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन पायी चालत जात होत्या. यावेळी चालक- दादा हनुमंत नवगिरे, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर याने ट्रक क्र. एम.एच. 12 क्युडब्ल्यु 4720 हा निष्काळजीपणे चालवून फातीमा सय्यद यांना पाठीमागून धडक दिलल्याने त्या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारकामी न नेता, पोलीसांना खबर न देता नमूद ट्रक चालक घटनास्थळावरून निघून गेला. अशा मजकुराच्या गुलाब उस्मान सय्यद, रा. नेहरुनगर, मुरुम यांनी दि. 13.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments