Header Ads

वर्षभरापासून पाहिजे असलेला आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 93 / 2019 या मारहाण प्रकरणातील आरोपी- अनिल झुंबर काळे, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी, मौजे केशेगाव, ता. उस्मानाबाद हा मागील एक वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने त्यास आज दि. 13.08.2020 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. आनंदनगर च्या ताब्यात दिले आहे.


नाकाबंदी दरम्यान 183 कारवाया- 46,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 12.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 183 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 46,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.मनाई आदेशांचे उल्लंघन 42 पोलीस कारवायांत 8,700/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 12.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 30 कारवायांत- 6,000/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 12 कारवायांत 2,700/-रु. दंड प्राप्त.


अवैध मद्य विरोधी कारवाई

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): हरी कोंडीबा साळुंखे, रा. बावी, ता. उस्मानाबाद हा दि. 12.08.2020 रोजी बावी शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देशी- विदेशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 1,818/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, उमरगा: श्रीरंग शेटीबा कांबळे, रा. बलसुर, ता. उमरगा हा दि. 13.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी 28 लि. गावठी दारु (किं.अं. 1,600/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, लोहारा: तिरुपती परशूराम उत्कम, रा. कानेगाव, ता. लोहारा हा दि. 13.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 1,050/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.
       यावरुन वर नमूद 3 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments