Header Ads

नाकाबंदी दरम्यान 236 कारवाया- 58,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्तउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 02.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 236 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 58,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.
 “मनाई आदेशांचे उल्लंघन 70 पोलीस कारवायांत 16,900/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.02.08.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 62 कारवायांत- 12,400/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 7 कारवायांत- 3,500/-रु. दंड प्राप्त.
3)किराणा दुकानासमोर दरपत्रक न लावणे: 1 कारवाईत- 1,000/-रु. दंड प्राप्त.

No comments