उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात , एक ठार, एक जखमी 



पोलीस ठाणे, तुळजापूर: अशोक बिभिषन शिंदे, रा. चापडगाव, ता. कर्जत यांनी दि. 29.07.2020 रोजी 09.30 वा. सु. तुळजापूर घाटातील वळणावर ट्रक क्र. एम.एच. 12 केपी 9696 हा निष्काळजीपणे चालवल्याने ट्रक पलटला. यात ट्रकचा सहायक- संतोष मनोहर जाधव, वय 35 वर्षे, रा. वरवंट, ता. दौंड, जि. पुणे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर चालक- अशोक शिंदे यांनी घटनास्थळावरुन पलायन केूले. अशा मजकुराच्या सुनिल रोहीदास बोराडे, रा. दहीवडी, ता. शिरुर (कासार), जि. बीड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अशोक शिंदे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा दि. 31.07.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उमरगा: किशोर वामनराव पाटील, वय 40 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा हे दि. 19.07.2020 रोजी 16.00 वा. सु. मौजे माडज येथील रस्त्याने पायी चालत जात होते. दरम्यान गावातीलच- काशिनाथ गंगाराम सुगावे यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 3147 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून किशोर पाटील यांना पाठीमागून धडक दिली. यात किशोर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होउन उजवा पाय मोडला. अशा मजकुराच्या किशोर पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन काशिनाथ सुगावे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 31.07.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

पोलीस ठाणे, तुळजापूर: नितीन बिभिषन कोकरेृ रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर यांसह त्यांचे वडील- बिभिषन कोकरे यांना दि. 23.07.2020 रोजी 14.30 वा. सु. मौजे लाखवडगाव येथील आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- शंकर रंगनाथ कोकरे, राहुल कोकरे, बालाजी कोकरे अशा तीघांनी शेतजमीन मोजणी मान्य नसल्याच्या कारणावरून नितीन कोकरे यांसह त्यांच्या वडीलांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्‍क्यांनी, कुऱ्हाड, गजाने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन कोकरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा दि. 31.07.2020 रोजी नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

पोलीस ठाणे, येरमाळा: एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 25.07.2020 रोजी मध्यरात्री तीच्या राहत्या घरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात  कारणासाठी फुस लाउन अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 31.07.2020 रोजी नोंदवला आहे.


                                                                                    

No comments