Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
ढोकी: रामचंद्र दत्तात्रय पाटील, रा. किणी, ता. उस्मानाबाद यांनी हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 8928 ही दि. 09.08.2020 रोजी 11.00 वा. किणी शिवारातील किणी- तुगांव रस्त्याच्या बाजूस लावली असतांना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 10.08.2020 रोजी नोंदवला आहे.


 मुरुम: प्यारनबी बादशा मकानदार, रा. आचलेर, ता. लोहारा या आपल्या पतीसह दि. 08.08.2020 ते 10.08.2020 रोजी या कालावधीत बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 20 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1,00,000/-रु. रोख रक्कम चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या प्यारनबी मकानदार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा दि. 10.08.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद - वाशेक जलील मुल्ला, रा. साळुंकेनगर जवळ, उस्मानाबाद यांच्या साळुंकेनगर जवळ असलेल्या शेतातील पत्रा शेडचा कडी- कोयंडा दि. 09.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील 4 शेळ्या व 1 बोकड चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या वाशेक मुल्ला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 10.08.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments