पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकावरुन जनजागृतीउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 साथीच्या प्रादुर्भावामुळे अनेक मनाई आदेश अंमलात असुन गरजेनुसार त्यात वेळोवेळी बदल केले जात आहेत. या मनाई आदेशांची जनतेस योग्य माहिती व्हावी, गैरसमज दुर व्हावेत. या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तैनातीस असणाऱ्या पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नियमीतपणे जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बाजारपेठा, प्रतिबंधीत क्षेत्रे, गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. यातुन जनतेस मनाई आदेशांची योग्य माहिती होत असुन अफवा टाळण्यास मदत होत आहे.नाकाबंदी दरम्यान 158 कारवाया- 41,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 01.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 158 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 41,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे. मनाई आदेशांचे उल्लंघन 25 पोलीस कारवायांत 5,900/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.01.08.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 16 कारवायांत- 3,200/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 7 कारवायांत 1,700/-रु. दंड प्राप्त.
3)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: 2 कारवायांत 1,000/- रु. दंड प्राप्त.

No comments