Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल लोहारा: बंकट लक्ष्मण लंगोटे (माळी), रा. सास्तुर, ता. लोहारा हे दि. 02.08.2020 रोजी 10.00 ते 18.00 वा. चे दरम्यान कुटूंबीयांसह शेतात गेलेले होते. दरम्यान त्यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील मका धान्याच्या 5 पिशव्या, करडी पेंडच्या 5 पिशव्या, प्लास्टीकचे 50 क्रेट, लसनाची 1 गोनी, लोखंडी वजन काटा व लाकडी बाज असा एकुण 37, 200/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बंकट लंगोटे (माळी) यांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 04.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 
बेंबळी: शेतातील रस्त्यावर चिखल असल्यामुळे सद्दाम शेख, रा. धारुर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एबी 5586 ही दि. 26.07.2020 रोजी गावातील बावी रस्यावर 11.00 वा. लावली होती. ती सायंकाळी लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 05.08.2020 रोजी नोंदवला आहे.

  भुम: बाबासाहेब वीर, रा. कसबा भुम यांनी त्यांची टीव्हीएस मॅक्स 4 आर मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 0912 ही दि. 01.08.2020 रोजी 14.00 वा. सु. बस स्थानका समोरील आपल्या त्रिमुर्ती दुध डेअरी येथे लावली होती. ती 16.00 वा. लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 05.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments