Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे




पोलीस ठाणे, शिराढोण: 1)आकश शिंदे 2) प्रकाश शिंदे 3)सुनिल शिंदे 4)छायडाबाई शिंदे, सर्व रा.  लोहटा (प.), ता. कळंब अशा चौघांनी दि. 18.08.2020 रोजी 19.45 वा. सु. गावातील जि.प. शाळेच्या मैदानावर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- अजित दत्तु यादव व महादेव चंद्रसेन चौधरी यांना शिवीगाळ करुन कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजित यादव  यांनी दि. 19.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद जिल्हा: एका खेडेगावातील दोन गटांत ( नाव- गाव गोपनीय) दि. 19.08.2020 रोजी किरकोळ कारणावरुन संघर्ष होउन दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन मारहाण केली. यावरुन एका गटाने दुसऱ्या गटाविरुध्द ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत प्रथम खबर नोंदवली तर दुसऱ्या गटाने पहिल्या गटाविरुध्द महिलांचा विनयभंग केल्याची प्रथम खबर नोंदवली. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यात दि. 20.08.2020 रोजी 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत


अपघात


 आंबी: विजुबाई भोजराज गरड, वय 37 वर्षे, रा. चिंचपुर (खुर्द), ता. परंडा व मुलगा- अभिजीत असे दोघे दि. 05.08.2020 रोजी 14.00 वा. सु. मौजे चिंचपुर- वाटेफळ असा प्रवास मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4342 ने करत होते. दरम्यान लोणारवाडी शिवारात गावातीलच- लक्ष्मण कल्याण गरड- पाटील याने हिरो होंडा मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून अभिजीत चालवत असलेल्या मो.सा.ला धडक दिली. या अपघातात अभिजीत हा गंभीर जाखमी झाला तर विजुबाई गरड या उपचारादरम्यान मयत झाल्या आहेत. अपघातानंरत जखमीस वैद्यकीय उपचाराची मदत न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता लक्ष्मण गरड हा घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या भोजराज तुकाराम गरड यांनी दि. 19.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments