Header Ads

परंडा : चोरीच्या 2 मोटारसायकल जप्त, 2 संशयीत ताब्यात
 परंडा: पो.ठा. परंडा चे पोनि.  इक्बाल सय्यद यांच्यासह पोहेकॉ- काळेवाड, शेंडगे, पोना- सचिन कळसाईन, काटवटे, पोकॉ- माळी, कवडे, यांचे पथक दि. 01.08.2020 रोजी पो.ठा. परंडा हद्दीत रात्र गस्त करत होते. दरम्यान दोन व्यक्ती दोन मोटारसायकलवर संशयीतरित्या फिरत असतांना पथकास आढळले. त्यांची विचारपुस केली असता एकजण अल्पवयीन (विधीसंघर्ष ग्रस्त बालक) असल्याचे समजले तर दुसऱ्याने महादेव सुरेश पेटाडे, वय 21 वर्षे असे नाव सांगीतले. त्यांच्या जवळ हिरो डोंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 ए 7543 व विनाक्रमांकाची होंडा शाईन अशा दोन मो.सा. होत्या. त्या मो.सा. चा ताबा- मालकी याबाबत ते दोघे समाधानकारक उत्तरे देत नसलयाने पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

पथकाने गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. ही पो.ठा. परंडा गु.र.क्र. 193 /2020 या गुन्ह्यात चोरीस गेल्याचे समजले. तर दुसऱ्या होंडा शाईन मो.सा. चा  चासी- इंजीन क्रमांकाच्या आधारे ऑनलाईन शोध घेतला असता त्या मो.सा. चा नोंदणी क्र. एम.एच. 13 बीएफ 7491 असल्याचे व ती बार्शी येथून चोरीस गेल्याचे समजले. पथकाने नमूद दोन्ही मोटारसायकल जप्त करुन अल्पवयीन तरुनास त्याच्या पालकांच्या ताब्यात देउन उर्वरीत तपासकामी महादेव सुरेश पेटाडे हा पो.ठा. परंडा येथे कोठडीत आहे. 

1 comment

Nk said...

सर आमच्या गावतील पण
गाव वलगूड ता जि Osmanbad
वलगूड गावतील दोन गाड्या चोरि करणयास प्रत्यन केला पण गाडी एक चालू झाली नाही नाही दूसरी गाडी चोरून नेली 31/7/2020 रोजी रात्री