Header Ads

परंडा : आईबरोबर माहेरी निघालेल्या बायकोचा नवऱ्याकडून खूनपरंडा: आईबरोबर बायको माहेरी जात असल्याचे पाहून चिडलेल्या नवऱ्याने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना सरणवाडी मध्ये घडली.

श्रीमती सारिका हरिश्चंद्र जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांच्याकडे त्यांची आई- लक्ष्मी दादा क्षिरसागर, रा. मानकेश्वर, ता. भुम या पाहुण्या आल्या होत्या. दि. 28.08.2020 रोजी सारिका या आपली मुले- समाधान व ऋतुजा यांना सोबत घेउन आईसह पुणे येथे जाण्याच्या तयारीत होत्या. तसे करण्यास पती हरिश्चंद्र भिमराव जाधव यांनी पत्नी- सारिकास विरोध केला. तो विरोध पत्नी सारिका हिने न जुमानल्याने चिडुन जाउन हरिश्चंद्र जाधव यांनी सायंकाळी 16.45 वा. सु. कुऱ्हाडीने पत्नी- सारिका व सासु- लक्ष्मी यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खुन केला. अशा मजकुराच्या राहुल दादा क्षिरसागर, रा. मानकेश्वर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments