Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे बेंबळी: कुंडलिक अर्जुन कोळगे, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद व त्यांचे शेजारी- मनोज सदाशिव चिखले अशा दोघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 24.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही, गृहउपयोगी भांडी व किराणा सामान असा एकुण 73,500/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या कुंडलिक कोळगे यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद (ग्रा.): जयंत चंद्रकांत कदम, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 23.08.2020 रोजी 11.30 वा. येडशी शिवारातील येडशी- लातुर रस्त्यालगत होंडा युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 2797 ही लावली होती. ती त्यांना लावल्या ठिकाणी 16.00 वा. आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या जचंत कदम यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                            

No comments