Header Ads

अवैध मद्य विरोधी कारवाया
पो.ठा. लोहारा: संतोष शंकर थोरात, रा. धानुरी ता. लोहारा हा दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.

पो.ठा. वाशी: आक्काबाई लक्ष्मण काळे, रा. पारधीपिढी, गोलेगाव, ता. वाशी या दि. 23.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर दारुचा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 लि. गावठी दारु (किं.अं. 950/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या.

यावरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द पोलीसांनी म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

नाकाबंदी दरम्यान 112 कारवाया- 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद - कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 22.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 112 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200 ₹ दंड वसुल

उस्मानाबाद -  सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर राखण्यासंबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल दि. 22.08.2020 रोजी 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200/-रु. दंड वसुल केला आहे.

No comments