Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
 वाशी: संजय प्रतापराव साळुंके, रा. वाशी, यांच्या वाशी शिवारातील ‘प्रताप ॲटोलाईन्स पेट्रोल- डिझेल’ या पेट्रोलियम विक्री केंद्राच्या टाकी मधील 3,830 लि. डिझेल (किं.अं. 3,05,748/-रु.) दि. 11.08.2020 ते 21.08.2020 या कालावधीदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या व्यवस्थापक- तुकाराम ज्ञानोबा विर, रा. शेंडी, ता. वाशी यांनी दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): गोकुळ सुर्यभान बनसोडे, रा. सुर्डी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 21.08.2020 रोजी राहत्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1108 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या गोकुळ बनसोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

मुरुम: आनंद रमाकांत कुलकर्णी, रा. कंटेकुर, ता. उमरगा व बहीण- मनीषा श्रीराम देशपांडे, वय 36 वर्षे, रा. कोरेगाव, ता. उमरगा हे दोघे मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 1761 ने दि. 29.06.2020 रोजी 09.00 वा. मुरुम- कंटेकुर जात होते. दरम्यान कंटेकुर शिवारातील पुलावर आनंद यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवल्यामुळे पाठीमागे बसलेल्या मनीषा देशपांडे या खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागुन उपचारादरम्यान त्या मयत झाल्या. अशा मजकुराच्या श्रीराम मनोहरराव देशपांडे (मयताचे पती) यांनी दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह  मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments