Header Ads

वाशी: जुगार विरोधी कारवाईपोलीस ठाणे, वाशी: विठ्ठल नारायण मोटे, रा. पारगांव, ता. वाशी हा दि. 19.08.2020 रोजी पारगांव (री.) येथील महाराष्ट्र बँकेच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालविण्याच्या साहित्य व रोख 860/- रु. रकमेसह पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला. यावरुन त्यांच्याविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


अवैध मद्यविरोधी कारवाई

पोलीस ठाणे, लोहारा: भरत गोकुळ साळुंके, रा. धानुरी, ता. लोहारा हे दि. 18.08.2020 रोजी गावातील जि.प. शाळेजवळ देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 750/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा दि. 18.08.2020 रोजी नोंदवला आहे.

नाकाबंदी दरम्यान 163 कारवाया- 39,900 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 18.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 163 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 39,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments