Header Ads

येरमाळा: सुनेचा छळ, गुन्हा दाखलयेरमाळा: ज्योती आकाश चोपडे, रा. तेरखेडा, ता. वाशी या माहेरहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1)आकाश बजरंग चोपडे (पती) 2) भारती चोपडे (सासु) 3)बजरंग चोपडे (सासरा) 4)अंजली राऊत (नणंद) सर्व रा. बार्शी या सर्वांनी ज्योती यांचा सन- 2018 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. माहेरहुन पैसे न आनल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्योती चोपडे यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 22.08.2020 रोजी नोंदवला आहे.

दोन  गटात हाणामारी 

 उस्मानाबाद  -  सुशेन रामा चांदणे, वय 51 वर्षे, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांच्या गटाचा गावातीलच युवराज महादेव साबळे यांच्या गटाशी पुर्वीचा वाद आहे. यातून दि. 21.08.2020 रोजी 18.30 वा. सु. गावातील साठे चौकात दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन गज, काठी, दगड, तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 2 गुन्हे दि. 22.08.2020 रोजी भा.दं.सं. कलम-  143, 144, 147, 148, 149, 323, 307, 427, 504 अन्वये नोंदवण्यात आले आहेत.


खटला मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण 

मुरुम: काशीनाथ आणाप्पा कलशेट्टी, रा. आलुर, ता. उमरगा हे दि. 20.08.2020 रोजी 19.30 वा. सु. गावातील हनुमान मंदीरजवळील रस्त्याने जात होते. यावेळी गावकरी- 1)सागर पाटील 2)निखील पाटील 3)अविनाश बोळदे 4)श्रीकांत बोळदे 5)प्रशांत जेवरे 6)सुधाकर कुंभार 7)शंकर कुंभार 8)सोमया स्वामी 9)सुभांत महाराज 10)शारदा कुंभार या सर्वांनी दाखल खटला मागे घेण्याच्या कारणावरुन काशीनाथ कलशेट्टी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. यात काशीनाथ यांच्या उजव्या हाताची बोटे मोडली आहेत. अशा मजकुराच्या कशीनाथ कलशेट्टी यांनी दि. 21.08.2020 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments