Header Ads

लोहारा: विद्युतपंप चोरीचा पर्दाफाश, 4 आरोपींच्या ताब्यातून 8 पंप जप्त
पोलीस ठाणे, लोहारा: शेततळे, विहीरी येथील विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीतील 1)गणेश बन्सी जाधव 2)सचिन वामन राठोड 3)अशोक धनसिंग राठोड 4)भाऊसाहेब रावसाहेब जाधव, सर्व रा. आनंदनगर तांडा, मौजे खेड, ता. लोहारा यांना काल दि. 08.08.2020 रोजी लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 8 विद्युतपंप जप्त केले आहेत. त्या पैकी एक पंप हा लोहारा पो.ठा. गु.र. क्र. 155/2020 नुसार चोरीस गेलेला होता. तसेच उर्वरीत 7 विद्युतपंप हे ताब्यात असल्याबाबत वरील चौघे संशयीत हे पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ते पंप चोरीचे असल्याचा पोलीसांना दाट संशय असुन पोलीस पथक त्या विद्युतपंपांबाबत अधिक तपास करत आहे.3 वर्षांपुर्वी लुटमार केलेल्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात


स्थानिक गुन्हे शाखा: चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध सायबर पो.ठा. मार्फत निरंतर घेतला जातो. ओप्पो मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून नेल्यामुळे भा.दं.सं. कलम- 394 नुसार भुम पो.ठा. गु.र.क्र. 101/2017 दाखल आहे. हा मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 08.08.2020 रोजी आरोपी- दयानंद संदीपान साबळे, वय 41 वर्षे, रा. अंदोरा, ता. कळंब यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त केला आहे.

ही कारवाई सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि-  श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.


चोरी.
पोलीस ठाणे, बेंबळी: वैजीनाथ होळकर, रा. शिवाजीनगर, ता. उस्मानाबाद यांच्या शिवाजीनगर येथील पत्रा शेडचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 08.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील 7 शेळ्या- बोकड चोरुन नेले. अशा मजकुराच्या वैजीनाथ होळकर यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 461 अन्वये गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments