Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्यविरोधी कारवायाउस्मानाबाद 1) अजरोद्दीन अहमद तांबोळी 2) प्रेम पंडीत धुर्वे, दोघे रा. झोरे गल्ली, उस्मानाबाद हे दि. 26.08.2020 रोजी उस्मानाबाद शहरातील नगरपालीकेच्या गाळ्यात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 820/-रु. बाळगले असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पोलीसांनी दि. 26.08.2020 रोजी 23.35 वा. शहरातील कल्पनानगर येथील अमर अहमद चाऊस यांच्या घरासमोरील अंगनात छापा मारला. यावेळी  अमर चाऊस यांच्यासह जोतीराम ठोंबरे, अमित जाधव, मौलाना रसूल शेख, शाहिद सय्यद असे 5 व्यक्ती तीरट जुगार खेळत असतांना आढळले. पोलीसांनी तीरट जुगार साहित्य व खेळातील 27,350/-रु. रोख रक्कम जप्त करुन नमूद म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे


अवैध मद्यविरोधी कारवाई

तुळजापूर: खंडु उमराव लोहार, रा. वडगाव (लाख), ता. तुळजापूर हा दि. 26.08.2020 रोजी गावातील शंभु ढाबा येथे देशी- विदेशी दारुच्या 56 बाटल्या (किं.अं. 4,090/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळला.

 बेंबळी: बाळासाहेब गोरोबा मिसाळ, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद हा दि. 26.08.2020 रोजी केशेगाव कारखाना येथील दारुच्या बंद दुकानासमोर देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,248/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळला.

1 comment

आई बाबा said...

आहो साहेब कोन खरा पोलिस आसतिल तर तेनला कळवा नागुर गावात तिन देशी दारू दुकान आहेत काय करतील बगा