Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाया
पोलीस ठाणे, ढोकी: दशरथ राजेंद्र पवार व हिराजी विठ्ठल उमासे, दोघे रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दि.27.08.2020 रोजी मौजे तेर येथे एका टपरीच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 2,040/-रु. बाळगले असतांना स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पोलीसांनी दि. 27.08.2020 रोजी 18.45 वा. शहरातील एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे छापा मारला. यावेळी 1)जमीर तांबोळी 2)राजु मुददे 3)जावेद सौदागर 4)शाकेर तांबोळी 5)अंकुश मुददे 6)लहु मुददे 7)मैनोद्दीन शेख, सर्व रा. आगडगल्ली, उस्मानाबाद असे 7 व्यक्ती कल्याण मटका जुगार खेळत असतांना आढळले. पोलीसांनी कल्याण मटका जुगार साहित्यासह खेळातील 16,510/-रु. रोख रक्कम व दोन मोबाईल फोन जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नाकाबंदी दरम्यान 215 कारवाया- 45,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 27.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 215 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 45,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments