Header Ads

मनाई आदेश झुगारुन नेत असलेला 4.82 मेट्रीक टन तंबाखु नाकाबंदी दरम्यान जप्त
पोलीस ठाणे, परंडा: कोविड- 19 संसर्गास प्रतिबंध होण्यासाठी तंबाखु विक्रीस मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन दि. 25.08.2020 रोजी आयशर मिनी ट्रक क्र. जी.जे. 16 एयु 3921 हा 4.82 मेट्रीक टन तंबाखु (किंमत 3,54,000/-रु.) वाहतूक करत असतांना सोनारी टी जंक्शन, करमाळा रस्ता येथे नाकाबंदी दरम्यान परंडा पो.ठा. च्या पथकास आढळला. यावरुन पोउपनि- श्री. दादासाहेब बनसोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन ट्रक चालक- समीर अन्नवर राज, रा. निकोडा, ता. भरुच, राज्य- गुजरात याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


नाकाबंदी दरम्यान 265 कारवाया- 57,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 25.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 265 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 57,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

No comments