Header Ads

उमरगा : वैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
 उमरगा: संदेश लिंबराज मारेकर, वय 35 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा याने अवैधरित्या तलवार बाळगली आहे. अशी गोपनीय खबर मिळाल्याने उमरगा पोलीसांनी काल दि. 21.08.2020 रोजी 15.05 वा. सु. त्याला त्याच्या शेतातून तलवारीसह ताब्यात घेण्यात आले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोना- दत्तात्रय शिंदे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाया

 लोहारा: माणिक मनोहर मुसांडे, रा. धानुरी, ता. लोहारा हा दि. 21.08.2020 रोजी गावशिवारात देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,750/-रु.) अवैधपणे बाळगलेला तर त्याच दिवशी अशोक श्रीमंत राठोड, रा. होळी तांडा, ता. लोहारा हा राहत्या घरासमोर 18 लि. गावठी दारु (किं.अं. 1,540/-रु.) बाळगलेला पो.ठा. लोहाराच्या पथकास आढळला तसेच वैजीनाथ भानुदास दनाने, रा. वडगांव (गांजा), ता. लोहारा हा गावातील विलासपुर रस्त्याचे बाजूस देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 1,040/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना उपविभागी पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकास आढळला.

यावरुन 3 व्यक्तींविरुध्द पोलीसांनी लोहारा पोलीस ठाण्यांत म.दा.का. अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत.

No comments