Header Ads

उस्मानाबाद : जावा मोटारसायकलची डिलरशिप देतो म्हणून फसवणूक


 उस्मानाबाद - अमरसिंह रामराव देशमुख, रा. उस्मानाबाद यांनी ‘जावा’ मोटारसायकलची डिलरशिप मिळण्यासाठी क्लासीक लेजेंड प्रा. लि. चे सेल्स व मार्केटींग मॅनेजर- अनिकेत शुक्ला व चंद्रा होल्डर यांना दि. 05.08.2020 रोजी आरटीजीएस प्रणालीद्वारे 1,24,755/-रु. दिले. परंतु नमूद दोघांनी अमरसिंह देशमुख यांना तशी डिलरशिप दिली नाही व पैसेही परत केले नाहीत.  अशा मजकुराच्या अमरसिंह देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 420 अन्वये गुन्हा दि. 06.08.2020 रोजी नोंदवला आहे.  

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, लोहारा: भागवत शिवाजीराव बनकर-साळुंके, रा. धानुरी, ता. लोहारा यांच्या शेततळ्यातील 5 अश्व शक्ती पानबुडी विद्युत पंप हा दि. 30.07.2020 ते 06.08.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरला आहे. अशा मजकुराच्या भागवत बनकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 06.08.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: खंडु उमराव लोहार, रा. वडगाव (लाख), ता. तुळजापूर हे दि. 05.08.2020 रोजी 21.30 वा. सु. गावातील आपल्या ‘हॉटेल शंभु ढाबा’ येथे होते. यावेळी गावातीलच- सोपान शिंदे, विकास जगताप अशा दोघांनी ढाब्यावर येउन वडापाव करुन न दिल्याच्या कारणावरुन खंडू लोहार यांना शिवीगाळ करुन, काठी- दगडाने मारहाण केली. तसेच ढाब्याच्या गल्ल्यातील अंदाजे 2,300/-रु. जबरीने काढून घेउन गेले. अशा मजकुराच्या खंडु लोहार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गुन्हा दि. 06.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments