Header Ads

मनाई आदेश झुगारुन मंदीर प्रवेश करणाऱ्या दोघांवर 2 गुन्हे दाखल
तुळजापूर: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान ट्रस्ट, तुळजापूर या मंदीरात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई आहे. या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1) सदानंद शंकर राव, रा. उडपी हॉटेल, तुळजापूर यांनी दि. 08.05.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. तर 2) प्रशांत राम गुंडाळे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी दि. 05.06.2020 रोजी 13.30 वा. सु. नियमबाह्य रितीने मंदीर प्रवेश केला.

            अशा मजकुराच्या तुळजापूर मंदीर पोलीस चौकी येथील सपोनि- ज्ञानेश्वर कांबळे व पोउपनि- अशोक पिंपळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे पो.ठा. तुळजापूर येथे दि. 07.08.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पाहिजे आरोपी अटकेत


स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. उमरगा गु.र.क्र. 364 / 2019 या बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण प्रकरणातील आरोपी- नितीन चंद्रकांत कुकूर्डे, वय 26 वर्षे, रा. कुन्हाळी, ता. उमरगा हा मागील एक वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- बलदेव ठाकूर, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने त्यास दि. 08.08.2020 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. उमरगा च्या ताब्यात दिले आहे.


नाकाबंदी दरम्यान 232 कारवाया- 53,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 07.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 232 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 53,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.


मनाई आदेशांचे उल्लंघन 38 पोलीस कारवायांत 7,600/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि.07.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 37 कारवायांत- 7,400/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 1 कारवाईत 200/-रु. दंड प्राप्त.

1 comment

Unknown said...

Ata fashi honar ka yanna