Header Ads

व्यायामशाळेतील साहित्य संशयीतरित्या बाळगणाऱ्यावर कारवाई
पोलीस ठाणे, उमरगा: मल्टीजिम (आधुनिक व्यायामशाळा) मधील साहित्य उमरगा तालुक्यातील कुन्हाळी शिवारात बळी बब्रुवान एरडे, यानेआपल्या शेतात ठेवले असल्याबाबतची गोपनीय खबर पो.ठा. उमरगा यांच्या पथकास मिळाली. यावर पथकाने दि. 24.08.2020 रोजी 16.00 वा. बळी एरडे याच्या शेतात जाउन खात्री केली असता त्याच्या कब्जात बिईग ट्रिग फिटनेस इक्युपमेंट्स कंपनीचे व्यायामशाळा साहित्य (कि.अं. 4,00,000/-रु.) मिळुन आले. बळी एरडे हा त्या साहित्याची मालकी शाबीत करु न शकल्याने व पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने नमूद साहित्य जप्त करुन बळी एरडे यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 124 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

अपघात

पोलीस ठाणे, वाशी: ट्रक क्र. एम.पी. 09 एचएच 4187 च्या अज्ञात चालकाने दि. 23.08.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे पारगांव येथील रस्त्यावर ट्रक निष्काळजीपणे चालवून समोरील मो.सा. क्र. एम.एच. 13 बीएल 5509 ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील सुनिल संतोष शिंदे, रा. गिरवली, ता. भुम व त्यांचे आजोबा- गंगाराम लक्ष्मण फुलवरे हे दोघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुनिल शिंदे यांनी दि. 24.08.2020 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments